मराठी हस्ताक्षर स्पर्धा २०२३-२०२४
दिनांक २८ जून २०२३ या दिवशी मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतून तीन क्रमांक देण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण मराठी विभागातील श्री. निवृत्ती मुळमुळे, श्रीम. संध्या कुटे, श्रीम. विद्या मांडवे, श्रीम. अक्षता राणे यांनी केले.